loader image

मनमाड करांचा इतिहासातील ऐतिहासिक आनंददायी क्षण
करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त

Mar 4, 2022


मनमाड करांची तहान भागणार. मनमाड करांसाठी स्वप्नवत वाटणारी पाणी पुरवठा योजना सत्यात उतरणार.
मनमाड करांची पाणीटंचाई लवकरच दूर होणार.

मनमाड करांचा पाणीप्रश्न कायमचा दूर करण्याचा संकल्प करणारे, मनमाडच्या जनतेला पाणी उपलब्ध करून देण्याचे वचन देणारे आणि दिलेल्या वचनाला जागणारे सन्माननीय आमदार श्री सुहास आण्णा कांदे यांच्या अथक परिश्रमाने व प्रामाणिक प्रयत्नाने आज दिनांक ४ मार्च २०२२ रोजी करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मनमाडकरांसाठी तसेच मनमाड शहरातील माता-भगिनी साठी हा अतिशय आनंदाचा ऐतिहासिक क्षण आहे.
महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मनमाड नगर परिषदेचा पाणी पुरवठा प्रकल्प मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर त्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारसीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून मंजुरी चा शासन निर्णयाची प्रत नगर विकास मंत्री सन्माननीय ना.एकनाथ शिंदे साहेबांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे सुपूर्द केली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सादर करण्यात आलेल्या मनमाड नगर परिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पा संदर्भातील शासन निर्णयातील अटी व तरतुदी च्या व मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभाग यांनी दिलेल्या सुधारित तांत्रिक मान्यतेच्या अधीन राहून सदर योजनेसाठी सुमारे रुपये 257 कोटी निधीस शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.
करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर किंमत 257.15 कोटी असून प्रकल्प किमतीच्या 85 % म्हणजेच 218.58 कोटी रुपये राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान तसेच प्रकल्प किमतीच्या 15 % म्हणजेच 38.57 कोटी रुपये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग असणार आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातील प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर संबंधित नागरी स्वराज्य संस्थेने म्हणजेच नगर परिषदेने प्रकल्पाचा आर्थिक आराखडा नगरविकास विभागास सादर करावयाचा आहे, त्यानंतर कार्यरांभ आदेश दिल्यानंतर सदर प्रकल्पासाठी निधी चा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे

या अभियानाअंतर्गत मंजुर प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर म्हणजेच आज पासून सात दिवसाच्या कालावधीत निविदा करावी लागणार आहे व तीन महिन्याच्या कालावधीत कार्यारंभ आदेश घेऊन त्वरित कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
सदर योजना सुरळीत सुरू राहून जनतेला नियोजनबद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी या योजनेची देखभाल व दुरुस्ती बाबत आवश्यक ते नियोजन नगरपरिषद मनमाड मार्फत करण्यात येणार आहे

माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शासनाने मनमाड पाणी प्रश्नाबाबत समिती गठीत केली होती परंतु या समितीवर स्थानिक लोकप्रतिनिधी सदस्य नसल्यामुळे योजनेच्या कामकाजाची सध्या स्थिती काय आहे समजत नव्हते तसेच योजनेच्या मंजुरी साठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करण्यात अडचणी निर्माण होत होत्या ही बाब आमदार सुहास अण्णा कांदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच पाणीपुरवठामंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली होती, त्याप्रमाणे सदर समितीवर स्थानिक मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार सुहास आण्णा कांदे यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.
यानुसार अण्णासाहेबांनी पूर्ण कामकाज सर्व त्रुटी व योजने संबंधित तांत्रिक बाजूंवर सखोल अभ्यास की घरात सर्व परिस्थिती समजून घेतली आणि त्या दूर करण्यासाठी अनेक बैठका घेऊन मार्ग काढत शासनदरबारी सतत पाठपुरावा केला.
आमदार सुहास अण्णा कांदे आमदार झाल्या पासून मनमाड पाणीप्रश्नावर सदैव झटत होते अखेर या परिश्रमाला यश मिळाले आहे करंजवण योजनेच्या माध्यमातून आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मनमाड शहराचे गेल्या 60 ते 70 वर्षांपासून च्या पाणी प्रश्नाचा मुद्दा मार्गी लावला आहे.
करंजवण मनमाड योजनेला प्रशासकीय मान्यता मिळणे ही ऐतिहासिक घटना आहे आणि म्हणूनच मतदारसंघातील दमदार आमदार या जनतेची उपाधी खरी ठरवत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मोठी कामगिरी फत्ते केली आहे. या बलाढ्य कामगिरीचा मुळे मनमाडकर जनता सदैव स्मरणात ठेवली असे कार्य आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पार पाडले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.