Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आता मिळणार तीन एक्स्प्रेस गाड्यांचे जनरल तिकीट : रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Mar 14, 2022

कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षाहून अधिक कालावधीपासून रेल्वेची जनरल तिकीट बंद आहे. यानंतर रेल्वे सुरळीत झाल्या असल्या तरी प्रवाशांना आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नाही.

परंतु, आता मुंबईकडे धावणाऱ्या आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम, नांदेड- मुंबई राज्यराणी आणि नांदेड- मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये विनाआरक्षण तिकिटाला शनिवारपासून (दि.१२) सुरुवात झाली आहे. मुंबईकडून येणाऱ्या या रेल्वेंसाठी विनाआरक्षण तिकीट या महिन्याखेर मिळण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

खासदार हेमंत गोडसे, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याबाबतही यावेळी मागणी करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाचा निर्णय प्रवाशांसाठी सकारात्मक
रेल्वे प्रशासनाने तीन एक्स्प्रेसमध्ये सर्वसाधारण तिकीट देण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचे प्रवासी स्वागत करत आहेत. प्रशासनाने आता गोदावरी एक्स्प्रेस, इगतपुरी- भुसावळ शटल आणि नाशिक- भुसावळ पॅसेंजर त्वरित सुरू करावी. – नरेंद्र खैरे

अजून बातम्या वाचा..

झेवियर हायस्कूलचे मुख्याध्यापक सॅबी कोरिया हे 22 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

झेवियर हायस्कूलचे मुख्याध्यापक सॅबी कोरिया हे 22 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

मनमाड येथील संत झेवियर हायस्कूल चे माननीय मुख्याध्यापक सॅबी कोरिया हे 22 वर्षाच्या प्रदीर्घ...

read more
संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने गुणवंत खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न…..

संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने गुणवंत खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न…..

मनमाड (योगेश म्हस्के) : महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेली व्याख्यानमाला म्हणून ज्या विवेकानंद...

read more
पहिल्याच दिवशी मनमाड रेल्वे स्थानकात सर्वसाधारण प्रवाशी तिकीटाची साडेसात लाखाची विक्री

पहिल्याच दिवशी मनमाड रेल्वे स्थानकात सर्वसाधारण प्रवाशी तिकीटाची साडेसात लाखाची विक्री

सुमारे अडीच वर्षानंतर रेल्वेची प्रवाशांसाठी सर्वसाधारण तिकिट सेवा बुधवारपासून सुरू झाली . आणि...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]