Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2022 च्या अध्यक्षपदी सनी दत्ता फसाटे

Mar 15, 2022

सालाबादाप्रमाणे यंदाही सन 1986 पासून सलग 36 व्या वर्षी ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे चैत्र शुद्ध नवमी रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव साजरा करणे आणि भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक (नगर प्रदक्षिणा) यांचे नियोजन करणे साठी गत वर्षी चे समिती अध्यक्ष नितीन अहिरराव यांचे अध्यक्षतेखाली श्रीराम जन्मोत्सव समिती ची जाहीर बैठक आठवडे बाजार श्रीराम मंदिरात उत्साहात संपन्न झाली सर्व प्रथम मनमाड शहर व परिसरातील तसेच राज्य व देशातील सर्व ज्ञात अज्ञात मान्यवर दिवंगताना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा ओम मित्र मंडळ चे संस्थापक सदस्य नितीन पांडे यांनी ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती च्या 36 वर्षा च्या कार्याची व अयोध्या आंदोलन तील मनमाड चा सहभाग याची माहिती दिली व सन 2020 मध्ये श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिर उभारणी भूमिपूजन नंतर साजरा होणारा हा पहिलाच श्रीराम जन्मोत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा करावा असे आवाहन प्रास्ताविकात त्यांनी केले यानंतर सर्व उपस्थित कार्यकर्ते मधून श्रीराम जन्मोत्सव समिती 2022 ची खालील नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्ष :- सनी दत्ता फसाटे ,उपाध्यक्ष:-आकाश शिरसाट, जय घुगरे, सचिव:- सिद्धार्थ गुप्ता, सहसचिव:- राहुल सांगळे,कोषाध्यक्ष:-नितीन पांडे,सह कोषाध्यक्ष:- रवींद्र सांगळे गत दोन वर्षात कोरोना संकटा मुळे मनमाड शहराच्या धार्मिक परंपरे मध्ये मानाचे स्थान असणाऱ्या श्रीराम रथयात्रा मिरवणुकीला खंड पडला होता परंतु या वर्षी ही मिरवणूक मोठी काढण्यासाठी नियोजन करण्यात आले या बैठकीला शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद,आझाद आव्हाड,भाजपा शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजप मा कामगार अध्यक्ष नारायण पवार,जेष्ठ उमाकांत राय,श्रीराम जन्मोत्सव समितीचे सुभाष माळवतकर,समीर गुंजाळ,दिनेश केकाण,महेश बोराडे, रोहित गुप्ता, रोहित कुलकर्णी, गोपाळ कौराणी,सनी दुसाने ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजू भैय्या पवार, राजाभाऊ बुऱ्हाडे, राजेश घुगे,चेतन गंगेले,स्वप्नील मोहरिर वनवासी कल्याण आश्रम चे प्रकाश कुलकर्णी ,शशिकांत भागवत, दिलीप तेजवाणी,बबन आव्हाड, सुमेर मिसर, प्रथमेश गवळी,निलेश ताठे, योगेश इमले,स्वराज देशमुख,सनी पाटील,अभिजित रसाळ,संकेत शिंदे,प्रतीक परदेशी, शुभम खैरे,स्वराज करकाळे,हर्षल गवळी, प्रवीण धाकराव,केशवराव पाटोळे,दिनेश घुगे, यश खरोटे, शुभम दराडे,विकास जाधव,स्वराज गवळी, दीपक कवडे,ऋषिकेश सोनवणे, अजय सोपे,निशांत कुलकर्णी,आदी मान्यवर हिंदुत्ववादी संघटन व संस्था पक्ष च्या प्रमुख पदाधिकारी सह हिंदुत्ववादी कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते बैठकीचे सूत्र संचालन नितीन पांडे यांनी केले तर पसायदानाने बैठकीची सांगता झाली

अजून बातम्या वाचा..

पोषण महा २०२२ अंतर्गत मनमाड येथील सर्व अंगणवाडी केद्रांत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन  – शितल गायकवाड (एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक-२.मुख्यसेविका)

पोषण महा २०२२ अंतर्गत मनमाड येथील सर्व अंगणवाडी केद्रांत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन – शितल गायकवाड (एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक-२.मुख्यसेविका)

अंगणवाडी क्र.७८,७९,८०. मध्ये आज स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली ..या कार्यक्रमास मा.नगर आध्यक्ष...

read more
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवारी मनमाड शहरात : शिवसैनिकांत चैतन्याचे वातावरण

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवारी मनमाड शहरात : शिवसैनिकांत चैतन्याचे वातावरण

शुक्रवार दिनांक २३/९/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता पल्लवी मंगल कार्यालय येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष...

read more
मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपर फास्ट एक्स्प्रेस ला जानेवारी पर्यंत मुदतवाढ

मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपर फास्ट एक्स्प्रेस ला जानेवारी पर्यंत मुदतवाढ

सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - मनमाड उन्हाळी...

read more
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्षपदी अशोक रघूनाथ (खैरणार) पाटील

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्षपदी अशोक रघूनाथ (खैरणार) पाटील

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नाशिक येथे भुजबळ फॉर्म वर अखिल भारतीय समता परिषद चे संस्थापकीय अध्यक्ष माजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]