loader image
[ays_poll id=7]

राज्यातील शाळा १००% उपस्थितीसह सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाची परवानगी.

Mar 25, 2022


गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देभरभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं.
मागील काही महिनात्यांपासून हे निर्बंध शिथिल करून हळूहळू शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र आता संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं परवानगी दिली आहे.

परिपत्रक जारी करून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार, सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. तसंच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत.

तसंच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवण्याची परवानगीही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. कधी होणार परीक्षा इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा कधी घेण्यात याव्यात या संबंधीच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात याव असे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती आतापर्यन्त कोरोनामुळे शाळा सुरु नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत होतं. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र यातही संपूर्ण उपस्थितीसह विद्यार्थ्यांना शाळांना परवानगी नव्हती. मात्र आता अखेर शालेय शिक्षण विभागाकडून 100 टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.