loader image
[ays_poll id=7]

पुन्हा बेमोसमी पावसाची शक्यता ; बळीराजाच्या संकटात होणार वाढ

Apr 4, 2022


गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या चटक्यात भरपूर वाढ झाली आहे. विदर्भात उष्णतेची लाट आहे. पण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्‍याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा कमी होऊन एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना देखील आता राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे.

कुठे पडणार पाऊस:

आता राज्यातील कोकण व कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात आजपासून 3 ते 4 दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. के. एस. होसाळीकर यांनी याबाबत महत्वाचं ट्वीट केलं आहे.

एप्रिल महिन्यातील 5 तारखेला म्हणजेच उद्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापुरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आता यलो अलर्ट जारी केला गेला आहे. तसेच 6 एप्रिलला देखील या चारही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाट होऊन पाऊस पडू शकतो. कोकणातील नागरिकांना देखील गर्मीपासून दिलासा मिळणार आहे.

गेल्या 29 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट जबरदस्त होती. अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यांतील नागरिकांना उन्हाच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागल्या. काही ठिकाणी तापमान तब्बल 43.5 अंशाच्या वर पोहोचले होते. यामुळे उष्माघाताचे बळी देखील जात आहेत. यामुळे हवामान विभागाने काळजी घेण्याचं आणि दुपारच्या उन्हामध्ये बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

गेल्या मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवला. सध्या विदर्भात पारा सध्या 41 ते 43 अंशांवर असला तरी उर्वरित महाराष्ट्रात काल सरासरी तापमान अंदाजे 40 अंशांच्या दरम्यान होते. गेल्या काही वर्षांत आपण दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होत असल्याचे पाहत आहोत. मार्च महिना सुरू होताच कमाल तापमान रेकॉर्ड मोडून दुसरीकडे जागतिक तापमान वाढत आहे. विदर्भ व मराठवाड्यात उष्णतेची लाट आता तरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.