Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा मनमाड शहर राष्ट्रवादी पक्षाने केला निषेध

Apr 9, 2022

राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येऊन धरणे आंदोलन करण्यात आले. पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी काल झालेल्या आंदोलनातील खरे आंदोलनकर्ते व बोगस आंदोलनकर्ते यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.आंदोलनकर्त्यांवर कारवाई न झाल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळेस मनमाड शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देण्यात आला. निवेदनाची प्रत मा.तहसीलदार तथा मा.पोलिस निरीक्षक यांना देण्यात आली. या धरणे आंदोलनात शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, मा.नगराध्यक्ष योगेश पाटील,महिला शहराध्यक्ष अपर्णाताई देशमुख, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल हबिबभाई शेख, विट्ठल नलावडे, योगेश जाधव, युवती अध्यक्ष डॉली निकाले, प्रकाश बोधक,अमोल काळे,अमोल गांगुर्डे,बाबा पठाण,नितीन वाघमारे,अरविंद काळे,जावेद हकीम शेख,दत्ता भाऊ थोरात,आनंद बोथरा, असिफ अत्तार,अक्षय देशमुख,प्रसन्न पाटील,शुभम गायकवाड,सतीश जगधाने,पवन अहिरे,विशाल भाऊ, राहुल गवळी,रोहिणी वाव्हाल, यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सरकारची ” मेरा बिल मेरा अधिकार ” योजना. खरेदी करा , पक्के बिल घ्या अन् जिंका एक कोटी रुपयांपर्यंत रोख बक्षिसे!

सरकारची ” मेरा बिल मेरा अधिकार ” योजना. खरेदी करा , पक्के बिल घ्या अन् जिंका एक कोटी रुपयांपर्यंत रोख बक्षिसे!

  आपल्यातील बऱ्याच जणांना कुठलेही सामान विकत घेतल्यावर विक्रेत्यांकडून बिल घेण्याची सवय असते....

read more
मंगळवारी मनमाड येथे रोजगार मेळावा तर बुधवारी नांदगावला विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पण – दुष्काळाची तीव्रता बघता वाढदिवस साजरा न करण्याचा आमदार कांदे यांचा निर्णय

मंगळवारी मनमाड येथे रोजगार मेळावा तर बुधवारी नांदगावला विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पण – दुष्काळाची तीव्रता बघता वाढदिवस साजरा न करण्याचा आमदार कांदे यांचा निर्णय

पावसाने ओढ दिल्याने नाशिक जिल्ह्यासह नांदगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता पाहता वाढदिवस साजरा न...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]