Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एफ सी आय मधील सुरक्षारक्षकांचे थकीत वेतनासाठी गेट बंद आंदोलन

Apr 13, 2022

शहरातील भारतीय खाद्य निगम येथे सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या ६५ कामगारांचे गेल्या आठ महिन्यापासुन वेतन मिळत नसल्याने गेट बंद आंदोलन केले. ” पगार करा अन्यथा खुर्च्या खाली करा ” असे घोषणाबाजी यावेळी देण्यात आले.

      महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियनतर्फे ( सीटू संलग्न ) प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील प्रशासनाने वेळेवर वेतन देत नसल्याच्या निषेधार्थ गेट बंद आंदोलन करण्यात आले.भारतीय खाद्य निगम मध्ये नाशिक जिल्हा सूरक्षा रक्षक युनियनचे सभासद अन्न महामंडळ सूरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे . त्यांना सप्टेंबर २०२१ पासून आज पावेतो वेतन अदा केलेले नाही.याबाबत जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ व भारतीय खाद्य निगम प्रशासनास निवेदन देऊन चर्चा करूनही आज पर्यंत सुरक्षा रक्षकांना वेतन दिलेले नाही . त्यामुळे सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना यामुळे अनेक विध संकटांना सामोरे जावे लागत आहे.जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने खाद्य निगम व्यवस्थापना बरोबर चर्चा करून कार्यरत सुरक्षा रक्षकांचे वेतन तातत्काळ अदा करावे अन्यतः सुरक्षा रक्षक आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोक्षण करतील असे निवेदन भारतीय खाद्य निगम प्रशासन व जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांना देण्यात आले.

    या गेट बंद आंदोलनात विशाल सुरवसे , प्रकाश पगारे , सचिन दिवे , अनिल जगताप , राजू गवळी , सुनिल मगर , विनोद गवळी , दिनेश मोरे , कुशाल सोनार , अकील खान , रजिवान खान , आनंद सपकाळे , बी.टी. बागूल , बी.एस.बटाणे , पी.डी.सांगळे , आनंद चव्हाण , जावेद शेख , संतोष आहेर , प्रविण पगारे आदी सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]