Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

करंजवण योजना :आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश ; १५% लोकवर्गणी माफ करण्याची शासनाकडे विनंती ; मंत्री महोदयां चे सकारात्मक आश्वासन

May 5, 2022

आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मनमाड शहराची विकासगंगा ठरू पाहणाऱ्या करंजवण योजनेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांच्याकडे केलेला पाठपुरावा व करंजवण शासकीय समिती मार्फत केलेले प्रामाणिक प्रयत्नाचे फलीत म्हणून मनमाडकरांसाठी स्वप्नवत वाटणारी करंजवण बंद पाईपलाईन योजना 3 मार्च रोजी मंजुरी मिळून प्रत्यक्षात अवतरली. त्यामध्ये 257.15 कोटींची मंजुरी मिळाली होती. तिची वाढीव मंजुरी मिळवण्यासाठी परत त्यासाठी प्रयत्न करून वाढीव निधीनुसार 311.80 कोटीच्या निधीला महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोथान अभियानांतर्गत मंजुरी मिळवण्यासाठी आमदारांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून लवकरच या योजनेचे टेंडर प्रोसेस सुरू होऊन उद्घाटन करणार असल्याचे सुतोवाच आ.सुहासआण्णा कांदे यांनी केले.
त्याचबरोबर या योजनेसाठी 15 % टक्के लोकवर्गणी ही नगरपालिकेला अदा करावी लागणार आहे.
नगरपरिषेदेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ती सुद्धा वर्गणी माफ करण्याची मागणी आमदारांनी मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व नगरविकास मंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे केली असता.
याबाबतही सहानुभूतीपुर्वक विचार करण्याचे आश्वासन संबधितांनी आमदार साहेबांना दिल्याने हे एक मोठे यशच आमदारांच्या प्रयत्नांना मिळाल्याचे व मनमाडकरांना दिलेल्या वचनाची वचनपूर्तीच पूर्ण होत असल्याचा आनंद आमदारांनी व्यक्त केला.
ही बातमी शहरात येताच शहरातील जनतेने यासाठी अनेक आशिर्वाद व आभार रुपी भावना आमदार साहेबान प्रती व्यक्त होतांना दिसत आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले

नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले

नांदगांव : मारुती जगधने दिपावली, भाऊ बीज सन साजरा करायला ये जा करणार्या महिलांना गळ्यातील सोन्याची...

read more
मराठा आरक्षण संदर्भातील कागदपत्रां बाबत तहसीलदारांनी वैयक्तिक लक्ष पुरवावे – मनमाड शहरप्रमुख बोरसे यांचे निवेदन

मराठा आरक्षण संदर्भातील कागदपत्रां बाबत तहसीलदारांनी वैयक्तिक लक्ष पुरवावे – मनमाड शहरप्रमुख बोरसे यांचे निवेदन

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा/तालुका स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना होऊन अप्पर जिल्हाधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]