loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक जाहीर !

May 12, 2022

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांवरील मतदानाची तारीख जाहीर करण्यात आला आली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या १० जूनला मतदान होणार असल्याची शक्यता आहे.उमेदवारांना ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यामुळे संभाजीराजेंचे आव्हान एका जागेसाठी राहणार आहेत.
महाराष्ट्रातील ६ खासदारांचा राज्यसभेवरील कार्यकाळ ३ मे रोजी संपु्ष्टात आला आहे. यामध्ये संजय राऊत, प्रफुल पटेल, पी.चिदंबरम, पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे यांची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या खसादारांपैकी ३ खासदार भाजपचे तर ३ खासदार महाविकास आघाडीचे आहेत. यातील भाजपकडून राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना संधी देण्यात आली होती. परंतु संभाजीराजेंनी एकला चलोची भूमिका घेतल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. राज्यसभेच्या या ६ रिक्त जागा तात्काळ भरुन काढण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ राज्यातील ५७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामधील महाराष्ट्रातील ६ जागा आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप खासदारांनी निवड बिनविरोध करण्याची शक्यता आहे. परंतु निवडणूक घेण्याची वेळ आली तर १० जूनला मतदान होऊ शकते.

शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफूल्ल पटेल, काँग्रेसकडून पी.चिदंबरम यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. तर भाजपकडून पीयूष गोयल केंद्रीय मंत्री असल्यामुळे पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकतात तर विनय सहस्त्रबुद्धे यांना पुन्हा संधी देण्यात येऊ शकते.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.