मनमाड येथील चांदवड रोड येथील सगळे लॉन्स मध्ये नातेवाईकांच्या विवाहाच्या हळदी समारंभ आटोपून घरी परतण्यासाठी वाहनाची प्रतीक्षा करणाऱ्या छाया रमेश सानप, वय ५७ वर्ष यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सुमारे दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची पोत समोरून पांढरा शर्ट परिधान केलेल्या डबलसीट आलेल्या दुचाकीस्वाराने खेचून चांदवडच्या दिशेने धूम ठोकली. छाया सानप यांच्या तक्रारीवरून मनमाड शहर पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक जी.यु.तायडे पुढील तपास करीत आहेत.
सेंट झेवियर हायस्कूल चा निकाल ९९.२८ टक्के एवढा लागला
138 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, त्यापैकी डिस्टिंक्शन मध्ये 37 ,फर्स्ट क्लास मध्ये 64, सेकंड...









