Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठा महासंघ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर उभारणार !

May 21, 2022

मराठा महासंघ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर उभारणार! नांदगाव शिवस्फूर्ती मैदानावरील शिवस्मारकाचे जीर्णोद्धाराचे कार्य अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि आमदार सुहास अण्णा कांदे यांचे कार्य तत्परतेमुळे मार्गी लागले. अखेर ३ जानेवारी २०२२ रोजी भुमीपुजन करीत एका नयनरम्य सोहळ्यात दि १३ मार्च २०२२ रोजी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते शिव मंदिराचे लोकार्पण झाले.

आणि तेव्हा पासून मराठा महासंघाकडून जनतेच्या अपेक्षा वाढू लागल्या. याच भावनेतुन तालुक्यातील अनेक प्रलंबित विषयांवर मराठा महासंघा सोबत लोक चर्चा करू लागले,या चर्चेदरम्यान सन १९९२ पासून प्रलंबित असलेला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा विषय मराठा महासंघाने हाती घ्यावा अशी आग्रही मागणी होऊ लागली.
मागणी रास्त आणि प्रलंबित असल्याने मराठा महासंघाने विषय हाती घेतला,

अत्यंत कमी कालावधीत विविध ठिकाणाहून या विषयावरील संपूर्ण माहिती गोळा करून शासन निर्णयामध्ये उल्लेख असल्या प्रमाणे पुतळा मराठा महासंघ स्वखर्चाने बसवणार असे जाहीर केले,परंतु या बातमीने संपूर्ण तालुक्‍यात खळबळ माजली, अनेकांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या की पुतळ्यास लागणाऱ्या लाखो रुपयांचा खर्च मराठा महासंघ कसा करणार. एक अविश्वासाचे वातावरण तयार झाले. त्यामुळे मराठा महासंघाने तातडीने मुर्तीकार यांचा शोध घेऊन अत्यंत कमी कालावधीत शासन निर्णयातील निष्कर्ष प्रमाणे ब्राँझ धातूचा आकर्षक पुतळा तयार करून दि १ मे २०२२ या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुतळा बहुजन समाजा समोर प्रदर्शित करून समाजामध्ये विश्वास निर्माण केला.
पुतळा उभारण्याच्या परवानगीच्या प्रस्तावासाठी शासन निर्णया प्रमाणे एक वर्षाच्या आतील ठरावाची आवश्यकता होती. यामुळे नांदगाव नगरपालिकेचे १९९२ पासून वेळोवेळी केलेले सर्व ठराव कुचकामी ठरले, आम्ही नांदगाव नगरपरिषदेकडे नवीन ठराव मागितला असता. त्यांनी सांगितले की नांदगाव नगर परिषद बरखास्त झालेली आहे,आता प्रशासकीय राजवट असल्याने धोरणात्मक विषयावरील ठराव आम्ही देऊ शकत नाही.
आमच्याकडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेले दस्त ऐवज एक वर्षाच्या आतील व नियोजित ठिकानाचे असेच आहे परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीवरून मंदिरासाठी आमच्या परवानगीची गरज नाही,असे आम्हाला संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे, सकल धनगर समाजाने निर्णय घेतल्यास नांदगाव नगरपरिषदेच्या दस्तऐवजा प्रमाणे अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल धनगर समाज बांधव एकत्र मिळून लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम काम करु शकतात.
लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने दि २८ मे रोजी इतिहास तज्ञ प्राध्यापक डॉ.यशपाल भिंगे सर (नांदेड) यांचे व्याख्यान, महाप्रसाद व दि ३१ मे रोजी जयंतीची तयारी या सर्व नियोजित विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आम्ही दि १७मे २०२२ रोजी हनुमान मंदिर नांदगाव येथे बैठक आयोजित केली होती, परंतु बैठकीस समाजातील अनेक मान्यवर सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहू न शकल्याने ठोस निर्णय घेता आलेला नाही.
समाजाच्या कृतिशील सहभागाशिवाय हे सत्कार्य सिद्धीस जाणे अशक्य आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ छत्रपतींच्या विचारांवर चालणारी शंभर वर्षांची परंपरा लाभलेली संघटना आहे,मराठा महासंघाला कोणत्याही प्रसिद्धीची आवश्यकता नाही,पुतळा नियोजित ठिकाणी विराजमान व्हावा या एकमेव प्रामाणिक हेतूने आम्ही काम करीत आहोत. मंदिर बांधकाम करण्याची जबाबदारी कोणी धनगर समाज बांधव घेणार असतील तर आम्ही पुतळा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यास तयार आहोत,आणि लागेल ती मदत करण्यास तयार आहोत, त्यामुळे कोणीही कोणताही गैरसमज करून घेऊ नये.
शासन निर्णया प्रमाणे आम्ही स्वखर्चाने पुतळा उपलब्ध करून मराठा महासंघाने दिलेला शब्द पूर्ण केला आहे आता पुढील कार्य समाजाच्या कृतिशील लोकसहभागातून व्हावे,हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे कोणत्याही मंदिराचे संपूर्ण काम एका व्यक्तीने किंवा एका संस्थेने करू नये असे म्हटले जाते तेच योग्यही आहे,मराठा महासंघ कोणत्याही परिस्थितीत शासकीय नियमांचे उल्लंघन करणार नाही,अधिकृत व कायदेशीर रीत्या व सर्व नियमांचे पालन करीत अहिल्यादेवी यांच्या मंदिर व पुतळ्याची स्थापना करेल,तरी आम्ही येत्या रविवार दि २२ मे २०२२ रोजी सकल धनगर समाजासोबत व बहुजन बांधवांसोबत पुन्हा एकदा जाहीर बैठक घेण्याचा प्रयत्न करून या संदर्भात चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सकल धनगर समाज बांधवांना सोबतीला घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांदगाव येथे मंदिर बांधन्याची जबाबदारीचा स्विकार करणार आहोत,असे प्रसिद्धी पत्रक मराठा महासंघाचे तालुका प्रमुख,भिमराज लोखंडे यांनी जाहीर केले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]