मनमाड : आज दुपारी मनमाड शहर आणि परिसरामध्ये मान्सून पुर्व पावसाचे जोरदार आगमन झाले , अचानक आलेल्या पावसामुळे मात्र आज आठवडे बाजर असल्याने बाजार पेठेतील व्यापारी आणि नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासुन शहर आणि परिसरात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढुन , सोसाट्याच्या वारा आणि पावसाचे वातावरण तयार होत होते ,आज दुपारी अचानक पाऊसाचे आगमन झाले आणि साधारण तास भर झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली , आज शहरामध्ये पहीला पाऊस पडल्याने अनेक नागरिकांनी या पहिल्या पावसाचा आनंद देखील घेतला , या पावसामुळे वातावरणातील थोड्या प्रमाणात उष्णता कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे.












