loader image
[ays_poll id=7]

माझी वसुंधरा अभियान : सलग दुसऱ्यांदा शिर्डी साई मंदिर ने पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Jun 8, 2022


संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले शिर्डीचे साईमंदिर माझी वसुंधरा अभियानात सलग दुसऱ्यांदा राज्यात अव्वल ठरले आहे. माझी वसुंधरा अभियानात शिर्डी देवस्थानाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले असून राज्यातील स्वच्छ देवस्थानांमध्ये शिर्डीने बाजी मारली असून पंढरपूर वगळता सर्वच धार्मिक स्थळे स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असल्याच या अभियानातून समोर आलंय.
राज्यात शिर्डी , पंढरपूर, त्र्यंबकेश्वरसह अनेक महत्त्वाची देवस्थान असून माझी वसुंधरा अभियानात यावर्षी शिर्डी देवस्थानाने बाजी मारली आहे. सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचे 3 कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले असून या पुरस्काराच शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्तांनी स्वागत केले आहे. देशभरातून लाखो भाविक दरवर्षी शिर्डीत हजेरी लावतात. त्यामुळे शिर्डीतील स्वच्छता हे नगरपंचायत समोरील मोठे आव्हान आहे. तरी देखील सलग दुसऱ्या वर्षी शिर्डी नगरपंचायतने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून याविषयी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी अधिक महिती दिली आहे.

स्वच्छ मंदिर सर्व्हेची यादी

शिर्डी
पंढरपूर
शेगाव
त्र्यंबकेश्वर
कोल्हापूर
जेजुरी
तुळजापूर
शिर्डी नगरपंचायतला सलग दुसऱ्या वर्षी 3 कोटींचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. राज्यातील देवस्थानच्या यादीत शिर्डीने अव्वल क्रमांक पटकावला आहे. शिर्डी साई संस्थानच्या मदतीने केलेले काम इतर देवस्थानने केले तर राज्य स्वच्छ अभियानात देशात पहिल्या क्रमांकावर असू शकते.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.