मनमाड-येवला महामार्गावर तांदुळवाडी फाट्या जवळ ट्रक व दुचाकी यांच्यात अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडलीय.मनमाड च्या दिशेने येत असलेला मालट्रक आणि रस्ता ओलांडून जात असतांना झालेल्या अपघातात मोटरसायकल ट्रकच्या पुढील भागात गेल्याने तांदुळवाडी येथिल अण्णा चिमण शिंदे (५०) हे जागीच ठार झाले.याच रस्त्याने मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समरसिंह साळवे जात असतांना त्यांनी तातडीने तालूका पोलिस अधिकारी व रुग्णवाहिकेला फोन करत घटनास्थळी बोलवून घेतले.ट्रक खाली अडकलेली दुचाकी अखेर ट्रँक्टरच्या सहाय्याने काढण्यात येऊन मृत देह येवला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब
मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...