loader image
[ays_poll id=7]

वीजबिल भरणा संदर्भात आपणास मेसेज आला असेल सावधान

Jun 18, 2022

तुमच्या कामाची आणि अत्यंत महत्त्वाची तुम्हाला सतर्क करणारी बातमी आहे. तुम्हाला जर वीजबिल भरण्यासाठी मेसेज आला असेल तर सावध व्हा. कारण, वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट मेसेज पाठवून संपर्क साधण्यात सांगून लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अशा प्रकारे वीजग्राहकांना लुटणारी टोळी राज्यात सक्रिय झाली आहे. बनावट मेसेज पाठवून ही टोळी ऑनलाईन गंडा घातला जात आहे. त्यामुळे तुम्हाला वीजबिल भरण्यासाठी आलेला मेसेज खरंच वीज कंपनीकडून आलाय का याची खात्री करा नाहीतर ही टोळी तुमचं अकाऊंट रिकामं करेल.

वीजग्राहकांची कशी होतो फसवणूक?

  • महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना सिस्टीमद्वारे मेसेज येतो
  • वीजबिल भरलेलं नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असा मेसेज पाठवतात
  • असे मेसेज वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात येतात
  • बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल नंबरवरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवतात
  • ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगतात
  • ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यास मोबाईल हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास करतात
  • फसवणूक टाळण्यासाठी 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

  राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता...

read more
.