Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज रहा – शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदारांना सूचक संदेश

Jul 4, 2022

राज्यात स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवित मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक रविवारी रात्री झाली. त्या वेळी शरद पवार यांनी राज्यातील सद्य:स्थिती, नवीन शिंदे -फडणवीस सरकार यावर भाष्य केले. तेव्हा त्यांनी मध्यावधी निवडणुका होतील असं म्हटलं आहे. शरद पवार यांनी दोन मुख्य कारणांमुळे शिंदे सरकार कोसळेल असा दावा व्यक्त केला आहे. यापैकी पहिल्या कारणाबद्दल बोलताना पवार यांनी शिंदे गटाच्या नाराजीबद्दल भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते,” असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले आहे. तर दुसऱ्या कारणाबद्दल बोलताना पवार यांनी भाजपाच्या गटामध्येही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळता उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने नाराजी असल्याचं म्हटलं आहे. “भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही. त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे,” असेही पवार यांनी विशद केले. “ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता शिंदे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा,” असा संदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला. दरम्यान, आज ४ जुलै २०२२ रोजी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड होण्याची शक्यता आहे.

अजून बातम्या वाचा..

प्लास्टिक पुनर्वापर आणि स्वच्छ मनमाड कार्यक्रमात सहभागी व्हावे : विकास काकडे

प्लास्टिक पुनर्वापर आणि स्वच्छ मनमाड कार्यक्रमात सहभागी व्हावे : विकास काकडे

प्लास्टिक पुनर्वापर आणि स्वच्छ मनमाड कार्यक्रमांतर्गत केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मनमाड मधील...

read more
एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांच्या...

read more
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “ऊर्जा महोत्सव” कार्यक्रमाचा शुभारंभ ‘वीज देशाच्या प्रगतीतील अत्यंत महत्वपूर्ण घटक’ कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे प्रतिपादन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “ऊर्जा महोत्सव” कार्यक्रमाचा शुभारंभ ‘वीज देशाच्या प्रगतीतील अत्यंत महत्वपूर्ण घटक’ कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे प्रतिपादन

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य "अंतर्गत आझादी का अमृत...

read more
छत्रे विद्यालयाची ज्ञानेश्वरी चव्हाण ने राष्ट्रीय छात्र सेनेच्या रायफल शूटिंग मध्ये प्रथम क्रमांक  पटकावला

छत्रे विद्यालयाची ज्ञानेश्वरी चव्हाण ने राष्ट्रीय छात्र सेनेच्या रायफल शूटिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला

छत्रे विद्यालयाची विद्यार्थिनी एन सी सी कॅडेट ज्ञानेश्वरी चव्हाण हिने राष्ट्रीय छात्र सेनेच्या 50...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]