loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर पत्रकार संघाच्या गणेशोत्सव घरगुती देखाव्याचे बक्षीस वितरण संपन्न

Sep 12, 2022


मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धकांमधून विजेत्या देखाव्यांना आज पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले यामध्ये प्रथम पारितोषिक मयंक दीपक पाटील, अमोल रतन परदेशी (दोघांना विभागून), द्वितीय निलेश दिनकर जाधव, तृतीय तनिष्का राजेंद्र पटेल, उत्तेजनार्थ सौ वैशाली राहुल रसाळ, कुमारी जान्हवी सुनील महाले यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्प देऊन कौतुक करतांना तालुका समन्वय अमोल खरे, निलेश वाघ, अशोक बिदरी, नाना आहिरे, योगेश म्हस्के, गणेश केदारे, मिलिंद वाघ सर यांनी केले तसेच स्पर्धेसाठी जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, सतिष शेकदार, नरहरी उंबरे, संदीप देशपांडे, अजय सोनवणे, उपाली परदेशी, तुषार गोयल, सौ स्वाती गुजराथी, सौ दीपाली खरे, सौ नैवेद्या बिदरी, रुपाली केदारे, अफरोज अत्तार, सॅमसंन आव्हाड, निलेश व्यवहारे, आंनद बोथरा आदींनी प्रयत्न केले.

 

 

 


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.