loader image
[ays_poll id=7]

कबड्डी स्पर्धा आटोपून परतणाऱ्या बेपत्ता मुली पालकांच्या स्वाधीन : सुरक्षा रक्षक बलाची कामगिरी

Sep 13, 2022


कबड्डीखेळाच्या स्पर्धेसाठी दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे स्पर्धा आटोपुन अक्कल कुव्याहून परतीच्या प्रवासात पिंपळनेर येथून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मूली मनमाड रेल्वे स्थानकावर घाबरलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना गस्तिवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी स्थानकात नेऊन तपास केल्यानंतर शिक्षक व पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची घटना शनिवारी(१०सप्टेंबर)रोजी उघडकीस आली आहे. येथील रेल्वेच्या सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक गणेश कुमरावत,सहाय्यक उपनिरीक्षक साहेबराव ठाकरे हे रात्रीच्या सुमारास मनमाड रेल्वे स्टेशन गस्त घालत असताना फलाटावर संशयास्पद अवस्थेत दोन अल्पवयींन मूली फिरताना दिसल्या असता दोघीकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,दोघेही नवोदय विद्यालय अक्कलकुवा (नंदुरबार)येथे इयत्ता १० वी मध्ये शिकत असून ७ सप्टेंबर रोजी मुलीची आणि शिक्षकांच्या टीमसह जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव नाशिक येथे क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती.स्पर्धा आटोपुन हे सर्वजण बसने नंदुरबारला परत जात होते.वाटेत पिंपळनेर येथे दोन्ही बाथरुम करण्याच्या बहाण्याने बसमधून खाली उतरल्या आणि शिक्षकांना न सांगता नाशिकला गेल्या आणि नाशिकहून रेल्वेत बसून रेल्वे स्थानकावर आल्याचे सांगितले.वरील दोन्ही मुलींना सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पोलिस ठाण्यात बसवले.व त्यांना जेवण खाऊ घातले.त्यानंतर मुलींनी सर्व नाव पत्ता सांगितल्यावरुन एक मुलगी सुरत तर एक तळोदा,नंदुरबार येथील असून एकिने वडिलांचा मोबाईल क्रमांक दिल्यानंतर पोलिसांनी वरील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्या मुलींच्या हरवल्याची तक्रार त्यांच्या शिक्षकांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात केल्याचे सांगितले.त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक गणेश कुमरावत,साहेबराव ठाकरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक जी.पी.म्हस्के यांच्याशी याबाबत माहिती दिल्यानंतर पिंपळनेर पोलीसानी माहिती जाणून घेत सदर दोन मुलींना घेण्यासाठी टीम पाठवत असल्याचे सांगीतले.व उपनिरीक्षक बी.एम.मालचे, महिला पोलीस हवालदार व्ही. बी.निकुंभ,शिक्षक हे रात्रि सुरक्षा पोलीस ठाण्यात हजर होऊन कायदेशीर बाबी पूर्ण करून वरील दोन अल्पवयीन मुलींना सुखरूपपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान मूली ताब्यात मिळताच शिक्षकांनी येथील पोलिसांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

नवीन मोटार वाहन कायद्यातील अन्याय्यकारक तरतुदी रद्द कराव्यात -महेद्र बोरसे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस ( पवार गट )

नवीन मोटार वाहन कायद्यातील अन्याय्यकारक तरतुदी रद्द कराव्यात -महेद्र बोरसे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस ( पवार गट )

  नांदगाव सोमनाथ घोगांणे केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी...

read more
विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीवर – दे धक्का स्कूल वाहनाने विद्यार्थ्यांना  पोहचवले जात आहे शाळेत….  वाहतूक पोलिस लक्ष देतील काय?

विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीवर – दे धक्का स्कूल वाहनाने विद्यार्थ्यांना पोहचवले जात आहे शाळेत…. वाहतूक पोलिस लक्ष देतील काय?

नांदगाव : हम चले स्कूल पण स्कूल बस धक्कास्टार्ट असल्याने पोखरी घाटात बंद पडलेल्या स्कूल बसला धक्का...

read more
अंकाई टँकाई किल्ल्याजवळ शेतात आढळले भुयार – चर्चांना उधाण – पुरातत्व विभाग करणार प्रत्यक्ष पाहणी

अंकाई टँकाई किल्ल्याजवळ शेतात आढळले भुयार – चर्चांना उधाण – पुरातत्व विभाग करणार प्रत्यक्ष पाहणी

मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अनकवाडे शिवारात युवराज धिवर यांच्या शेतात नांगरणी सुरु असताना...

read more
राज्यशासनाने दिलेली आश्वासने अमलात आणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन छेडु – निलेश चव्हाण

राज्यशासनाने दिलेली आश्वासने अमलात आणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन छेडु – निलेश चव्हाण

नांदगाव : मारुती जगधने कांदाअनुदान, दुष्काळी अनुदान, अवकाळी पाऊस व गारपिट अनुदान,निर्यातबंदी,...

read more
.