loader image
[ays_poll id=7]

व्यापाऱ्याकडून जादा आलेले पैसे शेतकऱ्याने केले परत : शिंगवे येथील दत्तू लक्ष्मण जाधव यांचा प्रामाणिकपणा

Sep 14, 2022


मनमाड शहर कृषी उत्पन्न बाजार समितिमध्ये विकलेल्या मालाच्या पावतीत व्यापाऱ्याकडून चुकुन जास्त आलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने सदर व्यापाऱ्यास परत केले.शेतकऱ्याच्या ईमानदारी बद्दल बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्याचा सत्कार करून आभार मानले.
एकीकडे शेतकरी अडचणीत असताना मात्र वाढवा आलेले पैसे व्यापाऱ्याला पाच हजाराची रक्कम इमाने-ईदबारे व्यापाऱ्याला परत केल्याने त्याच्या या ईमानदार वृत्तिमुळे शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.दि ८ सप्टेंबर रोजी मनमाड बाजार समितीमध्ये परिसरातील शिंगवे येथील शेतकरी दत्तू लक्ष्मण जाधव यांनी कांदा विक्रीच्या माध्यमातून येथील कांदा व्यापारी पी.पी राका यांचे कडून कांदा विक्रीच्या रक्कमेपोटी रुपये ५००० रुपये रक्कम जास्त गेलेली होती.सदरची बाब जाधव त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदरची माहिती श्री.राका यांना सांगीतल्यानंतर कौतुक करून बाजार समितिमध्ये त्या शेतकऱ्यांचा सत्कार केला.यावेळी सदरची ५००० रूपयाची रक्कम संबंधित व्यापारी यांना परत केली.यावेळी श्री.जाधव यांचे सर्व उपस्थितांनी रक्कम परत केल्याने सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड,नितिन दराडे,साहेबराव घुगे,नाना उगले आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.