loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये हिंदी दिवस साजरा

Sep 14, 2022


मनमाड : एच.ए.के. हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये संस्था व शाळेचे समन्वयक श्री.अमोल निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४/९/२०२२ रोजी हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी हिंदी कविता, कथा सादर केले.तसेच हिंदी भाषेतून प्रश्नमंजुषा घेण्यात आली व प्रथम तीन विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ यांनी अध्यक्षीय भाषणात हिंदी दिवसाचे महत्व स्पष्ट केले.व हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर,शेख आरीफ कासम व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे उपशिक्षिका सौ. गायकवाड अश्विनी नितीन व उपशिक्षक प्रदीप पाटील यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.