loader image
[ays_poll id=7]

मालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी: व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Sep 15, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

मालेगाव येथून नांदगाव येथे येण्यासाठी सांयकाळी ७ वाजेनंतर एकही बस नसल्याने नांदगाव व्यापारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे
याबाबत वृत असे की नांदगाव शहराचे अर्थिक दळणवळण मालेगाव शहराशी निगडीत आहे. विविध आजारा वरील दवाखाने मालेगाव येथे आहे तसेच किराणा मालाची मोठी बाजारपेठ सोयगाव व टेहरे येथे आहे. नांदगाव शहरातून मोठा व्यापारी वर्ग मालेगाव शहराशी निगडीत असून रोज या ठिकाणी बरेचशे व्यापारी विविध सामान खरेदी करण्यासाठी ये जा करीत असतात . तसेच विविध आजारा वरील पेशंट या ठिकाणी नियमीत तपासणी साठी ये – जा करीत असतात . असे असताना सांयकाळी ७ वाजेनंतर एकही बस मालेगाव येथून नांदगावला येण्यासाठी नाही.या अगोदर सदर बससेवा सुरु होती. पंरतू कोवीड च्या आपद्ग्रस्त स्थितीत सदर बससेवा बंद झाली होती . त्यामुळे प्रवाशी वर्गाचे मोठया प्रमाणावर हाल होत आहे. बरेचशा प्रवाशाना रात्री ७ वाजेनंतर मनमाड मार्गे नांदगाव येथे यावे लागते तरी नांदगाव आगाराने प्रवाशांच्या भावनाचा विचार करून त्वरीत सायंकाळी ७ वाजे नंतर ८ व ९ वाजता मालेगाव हून नांदगावला येण्यासाठी बस सुरू करावी अन्यथा रस्ता रोको सारखे मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे निवेदन नांदगाव शहर व्यापारी संघटनेने नांदगाव आगार प्रमुखांना दिले. निवेदनावर प्रकाश कंळत्री,विजय चोपडा यांची स्वाक्षरी आहे .


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.