loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात कायमस्वरूपी, कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडल अधिकारी नियुक्त करण्याची भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यासची जिल्हाधिकार्यांकडे मागणी

Sep 15, 2022


मनमाड :- मनमाड शहर हे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला मोठे शहर आहे, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मनमाड शहरात वारंवार मंडल अधीकारी बदलण्यात येत असून परिणामी मनमाड शहराच्या नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे.

मंडल अधीकारी बदली नंतर नवीन नियुक्त अधिकारी हे वेळेवर पदभार स्वीकारत नाही,त्या मुळे शहरातील नागरिकांना प्रतिज्ञापत्र व इतर शासकीय कामासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागतो मनमाडकरांना प्रतिज्ञापत्र वर सही साठी व इतर शासकीय कामा साठी नाईलाजाने नांदगाव तहसील येथे नेहमी जावेलागत आहे.

आज दि. 15/09/2022 रोजी देखील मनमाड शहरात कार्यकारी दंडाधिकारी, मंडल अधिकारी यांची अचानक बदली करण्यात आली.शहरातील नागरिकांतर्फे बदली झालेल्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची बदली झाली असल्याचे कळाले. तहसील कार्यालय नांदगाव येथे संपर्क साधले असता तेथे देखील कर्मचारी /अधिकारी यांची खूप कमतरता आहे, असे वरिष्ठ अधिकारी तर्फे सांगण्यात आले, या सर्व घटने नंतर भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन तर्फे थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून मनमाड शहरासाठी कायमस्वरूपी कार्यकारी दंडाधिकारी, मंडल अधिकारी नेमण्यात यावे, तसेच अचानक अधिकारी बदलीची गरज असल्यास त्या कार्यालयात कोणते काम (कार्य) किती दिवस बंद राहतील या संदर्भात तात्पुरता प्रभारी अधिकारी कोण आहे या संदर्भात नागरिकांना पूर्व सूचना देण्यात यावी अशी मागणी ह्यावेळेस जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली.                                                                                                                                                                                                    अन्यथा भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलनात तर्फे कोणत्याही क्षणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल ,असे मांगणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले,या वेळी नांदगाव तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे, कादिर शेख, विष्णू चव्हाण, दानिश शेख,शकील शेख,भास्कर भाऊ, व नाशिक शहरातील पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.