एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी )नासिक -२ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी गाव येथील स्वामी विवेकानंद शाळेत जाऊन पाचवी ते दहावीच्या इयत्तेच्या मुली व मुले यांना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चैताली मॅडम यांनी आहार आरोग्य व महिला व स्वास्थ्य याबद्दलही योग्य मार्गदर्शन केले तसेच PHN केशरी सिस्टर यांनी स्वच्छते बद्दल मार्गदर्शन केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सैंदाणे मॅडम शाळेतील शिक्षक वर्ग तसेच अंगणवाडी सेविका शितल बाविस्कर,आरोग्य सेवाका,पुजा गोवर्धन मॅडम ,वैशाली रणमाळे मॅडम, शितल जाधव मॅडम ,तसेच आशा सेविका सविता अहिरे ताई व प्रणाली राजपुत ताई तसेच मदतनीस ताई जिजाबाई मोरे या उपस्थित होत्या..सेविका ताईने पोषणासोबत शिक्षणदेखील महत्वाचे आहे या विषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले
युवा फाउंडेशन आयोजित ”नांदगाव रन” मध्ये शेकडो नांदगावकरांचा सहभाग
नांदगाव (सुमितकुमार जगधने) :- राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नांदगाव येथील युवा फाउंडेशनच्या वतीने...











