loader image
[ays_poll id=7]

जिल्हा बँक कडे जमा असलेल्या ठेवी व व्याजेच्या रकमेसाठी मंगळवारी मनमाड शहरात धरणे आंदोलन

Sep 19, 2022


नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमाड व नांदगाव शाखेत तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या जमा असलेल्या ठेवींच्या व्याजाची शंभर टक्के जमा रक्कम मिळावी , या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास तर्फे मंगळवार दि .२० रोजी बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . तसे संबंधित निवेदन शहर पोलिस प्रशासनाकडे देण्यात आले.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमाड तसेच नांदगाव शाखेत नांदगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थेच्या जमा असलेल्या ठेवींच्या व्याजाची १०० टक्के रक्कम व मुद्दल रक्कमेपैकी ४० टक्के जमा रक्कम परत मिळावी अशी नांदगाव तालुक्यातील नागरी , ग्रामिण , बिगरशेती , पगारदार सहकारी संस्थांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाकडे विनंती केली . सदर संस्थांच्या ठेवीची रक्कम २०१६ पासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या आहेत.

जिल्हा बँकेकडे असंख्यवेळा तोंडी व लेखी मागणी करून सुध्दा जिल्हा बँक पतसंस्थांच्या ठेवींची रक्कम परत देत नाहीत.त्यामुळे पतसंस्थांचे ठेवीदार आर्थिक अडचणीत येऊन त्यांच्यात अविश्वासाचे वातावरण तयार होत असल्याने सदर पतसंस्थांच्या ठेवी त्वरीत द्याव्यात . धरणे आंदोलन एन.डी.सी. बँक कांदा मार्केट गेट नं . २ येथे होईल , असे पत्रकाद्वारे भिमराज लोखंडे व सचिव भास्कर झाल्टे यांनी कळविले आहे.आंदोलनात २१ पतसंस्था सहभागी होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.