loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नामदार भारती ताई पवार यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे दिले आदेश

Sep 20, 2022


भारत सरकार च्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ सौ भारतीताई प्रविण पवार यांनी सोमवारी सायंकाळी भर पावसात मनमाड शहरात काल झालेल्या अतिवृष्टीच्या व पुरस्थिती ची प्रत्यक्ष पहाणी केली आणि पूरग्रस्त नागरिकांशी थेट संवाद केला या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी चे पंचनामे करण्याचे आदेश डॉ भारती पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले पूरग्रस्त पीडित नागरिकांना साठी आपद्ग्रस्त निधी तून तात्पुरते निवारा शेड त्वरित उभारावे आणि भोजन व्यवस्था करावी अश्या कडक सूचना त्यांनी या प्रसंगी केल्या मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण आणि रामगुळणा या दोन्हीं नदी पात्रा साठी संरक्षित भिंत बांधणे साठी योग्य कायदेशीर सोपस्कार करून निधी उपलब्ध करणेसाठी प्रयत्न करू असे त्यांनी या प्रसंगी सागितले या वेळी मंत्री डॉ पवार यांचे समवेत भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा आर्थिक सेल चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत या भाजपा पदाधिकाऱ्यांनसह नांदगाव चे तहसीलदार सिद्धार्थ मोरे,मनमाड नगरपालिकेचे मुख्यधिकरी सचिन पटेल मनमाड पोलिस स्टेशन चे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते या प्रमुख अधिकारी वर्गा सह सर्व शासकीय अधिकारी व मनमाड शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भर पावसात केद्रीय मंत्री डॉ भारतीताई पवार यांनी आपदग्रस्त पीडितांन शी जो संवेदशीलतेने संवाद करून त्यांना संकट काळी धीर दिला त्याची सर्वत्र चर्चा होती.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.