loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार : अंबादास दानवे यांनी घेतला विरोधकांचा समाचार

Sep 23, 2022


मनमाड :
शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावरच होत असतो. ही शिवसेना प्रमुखांपासूनची परंपरा आहे. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल अशी रोखठोक भूमिका विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाला मुंबईत दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली त्याचा दानवे यांनी समाचार घेतला. दानवे आज मनमाड दौऱ्यावर आले असताना बोलत होते.यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या एकेरी टिकेचाही समाचार घेतला.ज्या शिवसेनेने राणे यांना भरभरून दिले त्यांच्यावर टीका केली ही नारायण राणे यांची नामखराबी असल्याचे दानवे म्हणाले.

तसेच अमित शहांसमोर उद्धव ठाकरे दिवा असल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेचा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनमाड येथे खरपूस समाचार घेतला.एक दिवा काय करू शकतो हे बावनकुळे यांना सांगण्याची गरज नाही.अमित शाह जर सूर्य आहे तर उद्धव ठाकरे यांनी दिलेले एक महिन्यात निवडणुका घेण्याचे दिलेले आव्हान त्यांनी स्वीकारावे. निवडणुका घेण्यासाठी सरकार त्यापासून पळ काढतेय.उद्धव ठाकरे यांचे आव्हान पेलू शकत नाही म्हणून असे बेताल बोलत आहे.राज्यातील भाजपचे दिवे विझलेले आहे असे ही दानवे म्हणाले. ह्या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक,जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, संतोष बलीद,माधव शेलार, यांसह शिवसेनेचे पदाधिकारी,महिला आघाडी,युवा सेना आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.