loader image
[ays_poll id=7]

वसुंधरेच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण करून राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

Sep 26, 2022


मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्यातर्फे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन रा.से.यो. चे दत्तक गाव शिंगवे येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. शिंगवे येथील मतोबाच्या टेकडीवर हिवाळी शिबिरा अंतर्गत खोदण्यात आलेल्या ६९ सी.सी.टी चरमध्ये धरणीमातेच्या संवर्धनार्थ विविध देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी वसुंधरा संवर्धनाचे महत्त्व समजून वृक्षारोपणाला किती महत्त्व आहे तसेच राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर अशा उपक्रमशील कार्यक्रमातून वसुंधरा संरक्षणसाठी कार्य करू शकता असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तसेच राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालयात स्वयंसेविकांनातर्फे विविध जनजागृतीपर पोस्टर्स लावुन रांगोळी काढण्यात आली.या प्रसंगी महाविद्यालयाचे कुलसचिव श्री.समाधान केदारे, प्रा.जे डी वसईत उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी शिंगवे गावचे सरपंच शरद पाटिल, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी, डॉ. गणेश गांगुर्डे, प्रा. वर्षाराणी पेडेकर, दर्शन पाटील तसेच रा.से.यो. स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.