loader image
[ays_poll id=7]

मनमाड चा पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत होणार : मुख्याधिकारी पटेल

Sep 29, 2022


मनमाड शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा, पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
मनमाड मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पांझण व रामगुळणा या दोन्ही नद्यांना आलेला पूर, त्यातच वागदर्डी धरण ओव्हरफलो झाल्याने, त्यातून मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी,अशी स्थिती असतांनाही, ऐन नवरात्रौत्सव सणासुदीच्या दिवसांमध्ये, मनमाड शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा, पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

वागदर्डी धरणावर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापासून ते छोटा गुरूद्वारादरम्यान असलेली, ८०० मिमी क्षमतेची मुख्य जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती सुरू झाल्याने, शहरातील गावठाण विभागात २० दिवस उलटले, तरी पाणीपुरवठा झालेला नाही.
शहरातील चंदनवाडी, शिवाजी नगर आदी भागातील पाणी पुरवठा सध्याच्या १४ दिवसांआड ऐवजी १९ ते २० दिवसाआड होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. नागरीक व प्रामुख्याने गृहिणींमध्ये नाराजी पसरली आहे.

मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास विलंब झाला आहे. पालिकेच्या वतीने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून दुरुस्तीचे काम सुरू असून पाणीपुरवठाही सुरू करण्यात येईल असे मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांनी सांगितले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.