loader image
[ays_poll id=7]

निसर्ग मित्र समिती तर्फे हिंगणवाडी येथे वृक्षारोपण संपन्न

Sep 29, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील हिंगणवाडी येथे आज दिनांक गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती नांदगाव तालुक्याच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास संस्थेचे सरचिटणीस मा. रमेश अप्पा पगार तर प्रमुख पाहुणे म्हणून निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, धुळे जिल्हा संर्पक प्रमुख शाहीर वाघ सर,प्रा.सुरेश नारायणे,ॶॅड.बी.आर.चौधरी, पत्रकार अनिल आव्हाड , डॉ.हर्षद सुनिल तुझे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ख्याती हर्षद तुसे,वनपाल व्ही.एस.बोरसे,प्रभारी वनपाल ए.डब्ल्यु .लोखंडे,वनरक्षक एम. डी.चौधरी,एल .एच. काटकर,हिंगणवडी सरपंच सौ.मनीषा डोळे,उपसरपंच संभाजी बच्छाव,ग्रामपंचायत सचिव सुनिल मोकळ,ग्रा.पं.सदस्य रामभाऊ बागुल,अनुसया गायकवाड,कांताबाई खंबायत,जणन्याबाई शिंदे,सागर साळवे मनमाड,दिलीप निकम मनमाड,दिलीप सौंदाणे,सोमनाथ उडके साकोरा,पोलिस पाटील परशराम खंबायत,जेष्ठ नागरिक वामन खांबायत,सिद्धार्थ पवार,भास्कर मिस्कर,मुरलीधर देशमुख,नारायण शिंदे,खुशाल सोर,मच्छीन्द्र शिंदे इत्यादी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून गावकऱ्यांना हापूस,केशर जातीची आंब्याची रोपे व नारळ आणि जांभळाच्या रोपे वाटप करण्यात आली.सदर प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे यांनी निसर्ग मित्र समितीच्या कामकाजा बाबत माहिती दिली. तर प्रा. सुरेश नारायणे यांनी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाची उपस्थितांना माहिती दिली व आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देत वृक्ष रोपण व सनवर्धनाचे आवाहन करीत जल,जंगल व निसर्गाचे रक्षण करीत प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर वनाधिकारी बोरसे साहेबांनी रानभाज्यांचा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत पण त्या लोप पावत असल्याची खंत व्यक्त केली. व मनोगतात त्यांनी जंगल संपत्तीचे मणुष्य जीवनात महत्व असल्याचे सांगितले, समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब पगार यांनी निसर्ग मित्र या संस्थेच्या या उपक्रमाचे व हिंगणवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले व सदर अभियान यशस्वी करण्याचे आणि सदर वृक्षांची निगा राखण्याचे आवाहन करीत सदर स्तुत्य उपक्रमा बद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व समितीच्या वतीने नविन तालुकाध्यक्ष म्हणून प्रा.धीरजकुमार परमार यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला त्यांना तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्यास शुभेच्छा दिल्या.नंतर दिवाळीत प्रदुषण मुक्त राहाण्यासाठी फटाके नवाजविण्याबाबत ग्रामस्थांना प्रतिज्ञा देण्यात आली . मान्यवरांच्या सत्कारा नंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाधान चौधरी यांनी केले . धीरजकुमार परमार,दिलीप सौंदाणे,सागर साळवे,निकम सर,समाधान चौधरी,वामन खंबायत,सोमनाथ उडके,सुनिल मोकळ,परशराम खंबायत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.