loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आ. सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव मतदार संघात झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण

Oct 3, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील कळमदरी येथे आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्ण झाली असून या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज कळमदरी येथे पार पडला.यामध्ये जन सुविधा योजना २०२०-२१ अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज इमारत बांधकाम पूर्ण झाले असून आज आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. सोबतच ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील सभामंडप, स्मशानभूमी चे वॉल कंपाऊंड गाव अंतर्गत स्ट्रीट लाईट व दलित वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचे लोकार्पण आमदार सुहास कांदे यांनी केले.

या लोकार्पण सोहळ्यानंतर ग्रामविकास कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यामध्ये आदिवासी वस्तीवरील सभामंडप बांधणे, स्मशानभूमी अंतर्गत बैठक व्यवस्था शेडची निर्मिती करणे, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पेवर ब्लॉक बसवणे व सोलर सिस्टीम बसवणे या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गणेश चौधरी, बांधकाम विभागाचे उप अभियंता पाटील, माजी सभापती विलास आहेर, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, सभापती सुभाष कुटे, शेखर पगार, प्रमोद भाबड, किरण देवरे, दिलीप पगार सर, प्रमोद चव्हाण सर, मनोज पगार (सरपंच कळमदरी),उपसरपंच अंजनाबाई पगार, डॉक्टर विशाल पगार,सुरेश पगार, रमेश पगार, नितीन पगार,दिलीप पगार,सुनील सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, शेखर शेवाळे,शशिकांत पगार आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.