आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीत श्रावस्ती नगर येथील श्रावस्ती बुद्धविहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथाचे पठण करण्यात आले,
या वर्षावासाच्या समारोप प्रसंगी येवले मुक्तीभूमी येथील श्रामनेर संघास मा.नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्यावतीने भोजन दान देण्यात आले,
श्रावस्ती नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे श्रामनेर संघाचे आगमन होऊन त्याठिकाणी दीप धूप पूजा करून रॅलीच्या रूपाने श्रामनेर संघाचे स्वागत श्रावस्ती बुद्धविहार येथे करण्यात आले,
श्रामनेर संघाचे संघनायक पूज्य भन्ते सुमेधबोधी, मा.राजाभाऊ आहिरे,सचिन दराडे, पुष्पाताई मोरे, आम्रपालीताई निकम ,आर आर पवार आदींच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले
ग्रंथपठण करणारे आर आर पवार यांचा धृपदाबाई वामन आहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
मोनिकताई आहिरे व विशाल आहिरे यांचे वतीने श्रामनेर संघास धम्मदान करण्यात आले,
कार्यक्रमास परिसरातील सर्व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौध्दचार्य विलास आहिरे यांनी केले.

बुरुकुल वाडी प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस; नागरिक त्रस्त
मनमाड : बुरुकुल वाडी प्रभाग क्रमांक दोन परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा...