राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे जाहीर केले आहे. परंतू यावर्षी त्यांच्या बोनसमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहीती समोर आली आहे.यासाठी राज्य शासनाकडून 45 कोटी रुपये निधी एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय झाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसमध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे.
याआधी प्रत्येक वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस फक्त अडीच हजार रुपये आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये भेट दिली जात होती. मात्र आता सरकारच्या आदेशानुसार एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ताही मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
राज्य शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन 21 ऑक्टोबरला अदा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही ऑक्टोबरचे वेतन दिवाळीआधीच देण्याचे आदेश काढण्याची मागणी एसटी महामंडळाकडे केली असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले आहे.

मनमाड शहरातील प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला...