नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची ३१ ऑक्टोबरपर्यंत सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा सज्जड दम त्यांनी दिला. छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत फैलावर घेतले

मनमाड शहरातील प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला...