नांदगाव रेल्वे माल धक्का येथील जवळपास 350 कामगारांना आमदार सुहास कांदे यांच्याकडून दिवाळीची भेट देण्यात आली. शशिकांत सोनवणे यांच्या नियोजनात सर्व कामगार वर्गास आमदार निवासस्थानी पाचारण करत त्यांचे आदर तिथ्य करण्यात आले होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते प्रत्येक कामगारास एक ड्रेस व त्यांच्या पत्नीस साडी भेट देण्यात आली.
याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी उपस्थित सर्व मुकादम हमाल कामगार वर्गास दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येकाची विचारपूसही केली.
याप्रसंगी ज्ञानेश्वर कांदे किरण देवरे गुलाब भाबड सुनील जाधव सागर हिरे भाऊराव बागुल अय्याज शेख प्रकाश शिंदे आदीं उपस्थित होते.

मनमाड शहरातील प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला...