loader image

भाजपाचे आनंद शिंदे यांचा अभिनव उपक्रम – तब्बल १०००० पणत्यांचे वाटप

Oct 23, 2022


येवला शहरात भाजपा चे नासिक जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांच्या संकल्पने तून दीपावली निमित्ताने एक पणती प्रत्येक घरी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.10000 पेक्षा जास्त पणत्या चे वाटप दोन वर्ष कोरोना संकट काळा मूळे दीपावली सण साजरा होऊ शकला नाही पण यंदा दीपावली सण उत्साह ने साजरा होत आहे याच दीपावली निमित्ताने येवला शहरात भाजपा चे नासिक जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांनी आपल्या अनोख्या संकल्पनेतून एक पणती प्रत्येक घरी हे दीपावली शुभेच्छा देण्याचा अभिनव उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी ही राबविला आहे सध्या च्या काळात सर्वच राजकीय पक्ष, कार्यकर्ते सोशल मीडिया, डिजिटल बॅनर द्वारे मोठया जाहिराती करून दीपावली शुभेच्छा देत असतात पण आनंद शिंदे यांनी या ऐवजी चार पणत्या असणारे दीपावली भेट पाकीट आणि दीपावली शुभेच्छापत्र असे एकत्रित प्रत्येक कुटूंबा पर्यंत थेट प्रत्यक्ष संपर्क करून येवला शहरात सुमारे 2500 पेक्षा जास्त कुटूंबांना 10000 पणत्या चीं अनोखी भेट दिली आहे भाजपा येवला व आनंद शिंदे यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सर्वत्र चर्चा व कौतुक होत आहे आता काळ बदलला आहे राजकीय पक्षा नि केलेला नाटकी पणा जनता ओळखते म्हणून भाजपा च्या वतीने थेट भेट घेत हा संवेदनशील दीपावली शुभेच्छा उपक्रम हाती घेतला आहे यात नागरिकांन चा उत्तम प्रतिसाद आहे असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांनी सांगितले या येवला भाजपा च्या अभिनव उपक्रम मध्ये संभाजी डुकरे, प्रथमेश काबरा, हृषीकेश व्यवहारे, मयुर कायस्थ, नितीन काळन, संतोष काटे, विरेंद्र मोहारे, धनंजय नागपुरे, चेतन धसे, भुषण भावसार, कुंदन हजारे, तुषार खैरनार, विशाल चंडालिया, श्रीकांत खंदारे, संतोष सावंत, दिनेश परदेशी, गणेश खळेकर, युवराज पाटोळे यांच्या सह पदाधिकारी नी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.