मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारताचे पहिले शिक्षण मंत्री ,भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर हा ‘ शिक्षण दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात आला.
या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना इ.११ वी विज्ञान शाखेची विदयार्थीनी शेख मिश्कात अश्फाक व उपशिक्षक मोहम्मद साजिद अब्दुल गफूर,उपशिक्षका शेख तहेजीब आरिफ यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन जन्मदिवशी शिक्षणदिवस का साजरा केला जातो या बाबतचे महत्व विशद केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.शेवाळे भुषण सर संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम संस्था व शाळा समन्वयक श्री. अमोल निकम सर पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम यांनी राष्ट्रीय शिक्षण दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक खान अनिस सर यांनी केले. संस्था शाळा समन्वयक श्री. अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील गौरव नितेचे सहा बळी
मंगळवार 13 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आयोजीत...









