नांदगाव विधानसभेचे आमदार व शिंदे गटातील आ.सुहास कांदे यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केल्यावर आता यावर ठाकरे व शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आ.भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदार जास्त काळ समाधानी राहू शकत नाहीत, ज्या भाजप सोबत शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तीच भाजप आता शिंदे गटाला सुरुंग लावेल, अशी टीका केली आहे. तर शिंदे गटात कोणतीही नाराजी नसून सर्व आमदारांमध्ये चांगला समन्वय असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते आ.शंभूराजे देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.
मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...