मनमाड: दिनांक १३/११/२०२२ रविवार रोजी संत बार्णबा हायस्कूल येथे झालेल्या आंतरशालेय १७ वर्षाआतील (मुली) कराटे स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल ची खेळाडू रिनी नायर हीने यश संपादन केले. नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी तीची निवड झाली.
रिनी नायर ला क्रीडा शिक्षक व्यंकटेश देशपांडे व रिसम परविंदर यांचे मार्गदर्शन लाभले.
गुड शेफर्ड स्कूल चे प्राचार्य डॉ.क्लेमेंट नायुडु, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.
मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...