तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत के आर टी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये तालुकास्तरीय योगासन स्पर्धा पार पडली या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने आयोजित केली होती या स्पर्धेत केआरटी हायस्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी व एका विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात अथर्व लवहाटे या विद्यार्थ्यांने अतिशय उत्कृष्ट योगासन सादर करीत चौथा क्रमांक प्राप्त केला जिल्हास्तरावर या विद्यार्थ्यांची निवड झाली त्याचप्रमाणे अनुज संसारे .आयुष वाघ. सृष्टी सोनवणे .या विद्यार्थ्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली के आर टी हायस्कूलचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे विश्वस्त वैभव कुलकर्णी धनंजय निंभोरकर यांच्या तसेच विश्वस्त व संचालकांनी अभिनंदन केले क्रीडाशिक्षक विशाल झाल्टे व लहाने मॅडम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.
मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...