loader image

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान

Nov 14, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायतीला जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,कोरोना काळात आरोग्य कर्मचारी यांचे सोबत दररोज उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी गावातील प्रत्येक रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णांना धीर देत गाव अल्पावधीत कोरोनामुक्त केले.
ग्रामपंचायत कार्यालयाने नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम ग्रामपंचायत स्तरावर कोविड प्रतिबंधक लसीकरण आयोजित करून तसेच फवारणी सारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने नांदगाव तालुक्यात सर्वप्रथम कोरोनावर गावाने केली गावात अत्याधुनिक व्यायामशाळा,सुसज्ज स्मशानभूमी,गावातील भूमिगत गटारी, अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण,सर्व शिव रस्ते,सार्वजनिक शौचालय,भव्य दिव्य प्रवेशद्वार, ही कामे प्रगतीपथावर असून तरुणांसाठीअभ्यासिका,भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून सुधारित नळ पाणीपुरवठा योजना,शिवारातील प्रत्येक शेतासाठी रस्ता ही कामे प्रस्तावित आहेत.आठवड्यातील सातही दिवस शेतकरी ग्रामस्थांच्या सोयीनुसार सकाळी ८ ते ११ पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय उघडे असते.या कालावधीत उपसरपंच श्री यशवंतराव जाधव कर्मचारी वर्गासह जातीने उपस्थित राहून जनतेच्या अडचणी सोडवितात.
सर्व्हेक्षणासाठी आलेल्या राज्यस्तरीय समितीने या सर्व बाबींचा विचार व मूल्यमापन करून जळगाव खुर्द ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारासाठी निवड केली.अहमदनगर येथील माऊली संकुल येथे पार पडलेल्या भव्य समारंभात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचे हस्ते व सरपंच सेवा संघांचे संस्थापक यादवराव पावसे,बाबासाहेब पावसे,प्रदेश अध्यक्ष रोहित पवार जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर चे अध्यक्ष श्री उदयसिंग पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत जळगाव खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच यशवंतराव जाधव,ग्रामसेवक पवन थोरात,ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सरोदे,चैतन्य सरोदे,पोलीस पाटील रविंद्र पाटील सरोदे,जि प शाळेचे उपशिक्षक विजय तुरकूने यांना मानाचा आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान केला गेला.
सार्वजनिक सुट्टी असतानाही ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच कोरोना कालावधीत प्रत्येक बाधित रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला तसेच आरोग्य विभागाच्या सल्ल्याने पुरेशा उपाययोजना केली तसेच राज्य व केंद्र शासनाच्या ग्रामपंचायत क्षेत्रासाठी असलेल्या सर्व योजना गावात राबविण्याची आग्रही भूमिका घेतली.
आज गावाला राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाल्याने केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची तसेच भविष्यात अजून व्यापक कार्य करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी बोलून दाखविली.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.