Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विद्यार्थी २३५ अन् शिक्षक फक्त ३ – वंजारवाडी ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप

Nov 27, 2022

मनमाड शहरापासून जवळच असलेल्या वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असताना केवळ तीनच शिक्षक असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत निर्णय घेत शाळेला कुलूप ठोकले. पदानुसार शिक्षक दिले नाही तर पंचायत समितीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वंजारवाडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, यात सुमारे २३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र, या शाळेत शिक्षकांची सात पदे मंजूर असताना केवळ तीनच शिक्षक आहे. सदर शिक्षक आपापल्या परीने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शिक्षण देतात. अनेकदा मुलांना आपण काय शिकलो, हे लक्षात राहत नाही. तर अनेकदा शिक्षकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत समक्ष भेटून समस्या मांडल्या. मात्र, कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. पहिली ते सातवीपर्यंतच्या सात वर्गांचा भार तीन शिक्षकांवर पडतो. शुक्रवारी वंजारवाडीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ व पालकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले असता संतप्त ग्रामस्थ व पालकांनी ग्रामसभेत शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला. तातडीने चार शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या वेळी सरपंच कांचन गायकवाड, उपसरपंच अनुराधा सावंत, सदस्य संतोष पवार, जनाबाई गुंडगळ, पंकज जाधव, मच्छिद्र जाधव, अनिल दखणे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष लभडे, गोरख गुंडगळ, शरद जाधव, प्रकाश सावंत, भागीनाथ शिंदे, नथु गुंडगळ, अर्जुन गायकवाड, संजय शिंदे, पप्पू ठाकरे, ललिता पगारे, सतीश जाधव, दत्तू जाधव यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

अंगणवाडीत हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वागिण विकास

अंगणवाडीत हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वागिण विकास

राष्ट्रीय पोषण २०२२ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंगणवाडी...

read more
राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो: प्रा. सुरेश नारायणे

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो: प्रा. सुरेश नारायणे

सोमनाथ घोंगाणे नांदगाव येथील मविप्र संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय...

read more
पोषण महा २०२२ अंतर्गत अंगणवाडी लक्कडकोट येवला विभाग येथे गर्भवती महिलां आणि बालकांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ याविषयी करण्यात आली जनजागृती – सुज्ञा खरे एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक – २

पोषण महा २०२२ अंतर्गत अंगणवाडी लक्कडकोट येवला विभाग येथे गर्भवती महिलां आणि बालकांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ याविषयी करण्यात आली जनजागृती – सुज्ञा खरे एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक – २

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंगणवाडी क्र.६२, लक्कड कोट येवला विभाग येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]