नाशिक लगतच्या चुंचाळे शिवारात मानव जातीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे जन्मदात्या आई वडिलांनीच आपल्या बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली आहे. चुंचाळे शिवारात स्री जातीचे अर्भक फेकून दिल्याची बाब समोर आली होती. यामध्ये संतापजनक आणि धक्कादायक घटना पोलीसांच्या तपासात समोर आली आहे. जन्मदात्या आई-वडिलांनीच तिला अवघ्या काही तासात फेकून दिल्याची बाब समोर आली आहे. अवघ्या काही तासांची ती होती, मुलगी जन्माला आली म्हणून काही तासातच जन्मदात्यांनी तिला पिशीवीत कोंबलं. घरातून दोघेही बाहेर पडले, आणि चालता-चालता रस्त्याच्या कडेल कचऱ्यासारखे फेकून दिले. यामध्ये कडाक्याच्या थंडीत अवघ्या काही तासांचे बाळ रडत राहिले, मात्र, क्रूर आई-बापाला तीची दया आली नाही. भर थंडीत आपल्यात बाळाला त्यांनी फेकून दिले. कुत्र्यांनी नंतर संधी साधली. रडत असलेल्या बाळाचे हाताचे आणि पायाचे लचके तोडले. यामध्ये अतिरक्तस्राव झाल्याने बाळाचा मृत्यू झाला होता.

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!
आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...