loader image
[ays_poll id=7]

अशोक सराफ दक्षिण भारतात असते तर आज मुख्यमंत्री असते – राज ठाकरे

Jan 9, 2023

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील ह्या कार्यक्रमालाउपस्थित होते. राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचे कौतूक केले करतांना ते म्हणाले की अशोक सराफ दक्षिण भारतात असते, तर आज ते मुख्यमंत्री असते.
“अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. अशोक सराफ हे दक्षिणेत असते तर मुख्यमंत्री असते. ४०-४० फूट उंचीचे त्यांचे कटआऊट लावले असते. आपल्याकडे महाराष्ट्रात तसे काहीही नाही. कलावंत आहे का. मग ठीक आहे, एवढे बोलून आपल्याकडे विषय संपवला जातो. कलावंतांचं महत्त्व परदेशी गेल्यावर समजत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
“परदेशात कलावंतांच्या नावाने विमानतळे असतात. आपल्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. आपल्याकडे प्रतिमा जेवढी जपली जाते तेवढी प्रतिभा जपली जात नाही. मी अशोक सराफ यांचा कलावंत म्हणून नेहमीच आदर करत आलो. इतकी वर्षं लोकांना भूरळ घालणं तसेच सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणे सोपी आणि साधी गोष्ट नाही. अशोक सराफ युरोपात असते तर त्यांच्या स्वागतासाठी आज मंचावर पंतप्रधान असते,” असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले.

अजून बातम्या वाचा..

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त...

read more
मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय...

read more
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

फलक रेखाटन- देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
.