loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथील लासलगाव फाटा बनला आहे ॲक्सिडेंट स्पॉट दिशादर्शक आणि वेग मर्यादा फलक लावण्याची मागणी

Jan 9, 2023


मनमाड 🙁 योगेश म्हस्के )येथील मनमाड-चांदवड रोड येथील लासलगाव फाटा येथे अनेक दिवसांपासुन विविध अपघात होत असुन हा फाटा अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे.

मनमाड-चांदवड रस्त्याचे नुतनीकरणाचे काम पुर्ण झाले असुन , रस्ता चांगल्या प्रतीचा झाल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या आणि वाहनांचा वेग वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. याच रस्त्यावर मनमाड जवळच असलेल्या लासलगाव फाटा परिसरात चारही दिशांचे रस्ते एकत्र येत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनांच्या जास्त वेगामुळे अनेक अपघात घडत आहे.गेल्या काही दिवसांपासुन या परिसरात छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरू असुन यामुळे अनेकांना आपल्या वाहनांच्या नुकसानी बरोबरच वाहनधारकांच्या जीविताला ही धोका निर्माण झाला आहे.लासलगाव फाटा परिसरात अनेकदा वाहन चालकांना आपल्या योग्य दिशेने जाण्यासाठी आवश्यक असे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नसल्याने नवीन वाहन चालकांची यामुळे गैरसोय होत असते , अनेकदा या ठिकाणी बेशिस्त वाहन चालकांमुळे अनेक अपघात घडत आहे.

या परिसरात दिशादर्शक फलक लावण्यात यावे , वेग मर्यादेसाठी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे , मर्यादित स्पीड लिमिटचे फलक लावण्यात यावे , वाहतुक पोलिसांची येथे नियुक्ती करण्यात यावी , जेणेकरून वाहनांची वेग मर्यादा या ठिकाणी कमी प्रमाणात होऊन अपघातांचे प्रमाण कमी करता येईल अशी मागणी येथुन नेहेमी प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालकांच्या वतीने करण्यात येत आहे.


अजून बातम्या वाचा..

भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

मनमाड - भगवान महावीर यांच्या 2623 व्या जन्म कल्याणक दिनाचे चे औचित्य साधत मनमाड शहरात व परिसरात...

read more
मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

मनमाड - बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा...

read more
.