loader image
[ays_poll id=7]

भारताचे संविधान हा विषय शाळा-महाविद्यालयात अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत – शरद शेजवळ

Feb 10, 2023

येवला (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे,स्वायत्त विद्यापीठे,स्वयं अर्थसाहित विद्यापीठे,समूह विद्यापीठे व संचालक नवीन शिक्षण धोरण पुणे यांना पाठवलेल्या राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये यांत ‘भारतीचे संविधान’ हा अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे अध्यापकभारती कडून स्वागत करण्यात आले असल्याची माहिती अध्यापकभारती चे संस्थापक शरद शेजवळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील माननीय कुलगुरू सर्व अकृषी विद्यापीठे,स्वायत्त विद्यापीठे,स्वयं अर्थसाहित विद्यापीठे,समूह विद्यापीठे व संचालक नवीन शिक्षण धोरण पुणे यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या मा.कक्ष अधिकारी अ.द.काटकर साहेब यांच्या सही निशी निर्गमित केलेले राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये यांत ‘भारतीचे संविधान’ हा अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट करण्या संदर्भातील दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ चे जावक क्रमांक Gen/९७/ UE -३ हे पत्र निर्गमित झाले असून ह्या निर्णयाचे शरद शेजवळ यांनी स्वागत,अभिनंदन केले आहे.
भारतीय संविधानिक मूल्य विचार लोकशाही,समता,स्वातंत्र्य, बंधुता,न्याय,धर्मनिरपेक्षता,वैज्ञानिक दृष्टिकोन,राष्ट्रीय एकता-एकात्मता ह्या मूल्यांची रुजवणूक-संस्कार बालवयापासून मुलांमध्ये रुजावेत व वयोगटाप्रमाणे शाळा-महाविद्यालय व विद्यापीठातून “भारतीय संविधान” हा स्वतंत्र (अनिवार्य) विषय शिकवला जावा या करता आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र व राज्य सरकार या कडे आग्रही भूमिका मांडत असून ह्या मागणी करता परिसंवाद,परिषदा, मेळावे,अधिवेशने,व्याख्याने घेऊन लोकजागृती करत आहोत.आपल्या विभागात ह्या करता अनेक निवेदने दिली आहेत व सरकारच्या संबंधित सर्व विभागाकडे आग्रही मागणी केली आहे.
अध्यापकभारती,अखिल भारतीय संविधान साक्षरता अभियान स्वागत करत असून ह्या कामी आम्ही सरकारच्या सोबत आहोत.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे,स्वायत्त विद्यापीठे,स्वयं अर्थसाहित विद्यापीठे,समूह विद्यापीठे व संचालक नवीन शिक्षण धोरण पुणे व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यांनाही उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या सदर पत्राप्रमाणे ‘भारताचे संविधान’ विषय येत्या शैक्षणिक वर्षापासून अध्यापणास सुरवात करण्याचे आदेश द्यावे.शाळा महाविद्यालयात परिपाठ मूल्य शिक्षण तासाला रोज एका भारतीय संविधान कलमाचे वाचन करण्यात यावे अशी मागणी अध्यापकभारतीने शासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक-शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती व अखिल भारतीय संविधान साक्षरता अभियान वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर शरद शेजवळ,शैलेंद्र वाघ,सुभाष वाघेरे,महेंद्र गायकवाड,वनिता सरोदे,नितीन केवटे,प्रा.के.एस.केवटे,अक्षय गांगुर्डे,अभय लोखंडे,प्रशिल शेजवळ,राजरत्न वाहुळ यांच्या सह्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.