Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या टाळा – मनमाड इनर व्हील क्लब तर्फे जनजागृती २०० कापडी पिशव्यांचे वाटप

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या टाळा – मनमाड इनर व्हील क्लब तर्फे जनजागृती २०० कापडी पिशव्यांचे वाटप

नवरात्री उत्सवाचे खरे व्रत स्वच्छ करू अवघे भारत पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी...

read more
मनमाड अग्रवाल समितीच्या वतीने अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंती धुमधडाक्यात साजरी

मनमाड अग्रवाल समितीच्या वतीने अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंती धुमधडाक्यात साजरी

अग्रवाल समाजाचे दैवत व अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेन जी यांची 5148 वी जयंती नवरात्री चे प्रथम...

read more
नाईक यांच्या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस ; विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी घेतली भेट

नाईक यांच्या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस ; विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी घेतली भेट

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, माजी नगराध्यक्ष,नगरसेवक प्रविण नाईक यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]