Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा भाजपात प्रवेश

Mar 15, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनीही भाजप प्रवेश करत सर्वांना धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सुरेशबाबा पाटील, आमदार अॅड्. राहुल ढिकले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते. माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमामाताई पवार यांच्या कन्या वास्तूविशारद अमृता यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागामध्ये भाजपला बळ मिळणार आहे. अमृता यांनी देवगाव (ता. निफाड) गटातून जि.प. निवडणूक जिंकली होती.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ -मनमाड परिसरात मुसळधार पाऊस, शिंगवे येथील शेतकऱ्याचे ४ एकर कांद्याचे पीक गेले वाहून

बघा व्हिडिओ -मनमाड परिसरात मुसळधार पाऊस, शिंगवे येथील शेतकऱ्याचे ४ एकर कांद्याचे पीक गेले वाहून

मनमाडसह चांदवड तालुक्यात काल रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. आज सकाळ...

read more
जागतिक प्राणी दिवस

जागतिक प्राणी दिवस

वन्यजीव सप्ताह ७ ओक्टोंबर २०२२ पक्षी आणि सूर्य ... जंगलातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिथे होणारे...

read more
रविवारी भगवान वाल्मीकी जयंती तसेच ईद – ए – मिलाद : आठवडे बाजारातील व्यावसायिकांनी मिरवणूक मार्गावर दुकाने ठाटू नये – मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

रविवारी भगवान वाल्मीकी जयंती तसेच ईद – ए – मिलाद : आठवडे बाजारातील व्यावसायिकांनी मिरवणूक मार्गावर दुकाने ठाटू नये – मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

मनमाड शहरातील सर्व फळ विक्रेते ,भाजी विक्रेते तसेच सर्व व्यावसायीकांना नगरपालिका प्रशासनातर्फे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]