loader image
[ays_poll id=7]

नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

Mar 27, 2023


नंदुरबार जिल्हा क्रिकेट सोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार वरिष्ठ महिला जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडु साक्षी शुक्ला या खेळाडुची महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वार आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघामध्ये निवड झाली. छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे या मॅचेस २७ मार्च २०२३ पासुन खेळवल्या जाणार आहेत ज्यात साक्षी शुक्ला सहभागी होईल.
या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करुन साक्षी महाराष्ट्र राज्याच्या संघात सामील होऊन मनमाडसाठी पहिली रणजी खेळाडु होवो अशी अपेक्षा तिच्याकडून केली जात आहे.

मनमाड शहरातुन वरिष्ठ महिला जिल्हा संघासाठी खेळणारी साक्षी शुक्ला हि प्रथम महिला खेळाडु असेल. तिच्या चांगल्या कामगीरिसाठी सर्वाकडुन जागोजागी शुभेच्छा देण्यात येत आहेत. या कामगिरीसाठी साक्षीचे प्रशिक्षक श्री. सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांचे मार्गदर्शन तिला लाभले.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ ईरफान मोमीन व मार्गदर्शक राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , संजय निकम , श्रेणिक बरडिया , हबीब शेख , तय्यबभाई शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज शेख , कौशल शर्मा , सनी पाटिल , सनी फसाटे
तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे साक्षी शुक्ला हिचे अभिनंदन करुन पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त...

read more
मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय...

read more
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
.