चांदवड तालुक्यातील लोणच्या डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेला व समिट रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या लोणच्या डोंगरावर असलेल्या झाडे झुडुपाला आग लागली असून आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरतील युवक आणि शेतकरी बांधव अटोक्याचे प्रयत्न करीत आहे. वन विभागाने जवळजवळ वीस हजार झाडे या परिसरात लावले आहे. ह्या डोंगरावर सलग तीन वर्षापासून आग लागत असून अज्ञातांचा अजून तपास लावावा अशी मागणी भागवत झालटे यांनी केली आहे. कातरवाडी,वडगाव या परिसरातून मदतीसाठी 30 ते 35 युवक आग विझवण्यासाठी गेले आहे तेथील आदिवासी झोपड्यांमधील वीस ते पंचवीस युवक आग विझवण्यासाठी मदत करत आहे हवेमुळे आग आटोक्यात येत नसून आग लावणाऱ्या लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधव करत आहे.

खरीपातील कृषीच्या योजना व शेतकर्याना मिळणारा लाभ?
नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात अजुन ७०% पेरण्या होणे बाकी आहे .ज्या भागात पाऊस झाला तेथे...