Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.

अजून बातम्या वाचा..

नाशिक चे सराफ विजय बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक चे सराफ विजय बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक शहरातील सराफ व्यावसायीक विजय बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी अखेर तेलंगणाच्या तीन पोलीस...

read more
नांदगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे आज जागतिक योग दिनानिमित्त योग दिवस साजरा करण्यात आला.

नांदगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे आज जागतिक योग दिनानिमित्त योग दिवस साजरा करण्यात आला.

शिवसेना महिला आघाडीतर्फे नांदगाव शहरातील महिलांना या निमित्ताने योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फेआठव्या विश्व योग दिन निमित्ताने योग अभ्यास कार्यक्रम संपन्न

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फेआठव्या विश्व योग दिन निमित्ताने योग अभ्यास कार्यक्रम संपन्न

भाजपा मनमाड शहर मंडलाच्या वतीने भारतीय संस्कृती चा गौरव दिन म्हणून संबोधले जाणाऱ्या आठव्या विश्व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]